पुण्याच्या खेड तालुक्यातील कडधे येथे सदानंद बिगरशेती पतसंस्थेचे अध्यक्ष भुमाफीया शंकर देवदरे यांनी सहकार खात्याच्या अधिकाऱ्याशी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे बनावट वसुली दाखले मिळवले आहेत. या दाखल्यांच्या आधारे शेतकऱ्याची मिळकत धाक धमकी व दडपशाही मार्गाचा अवलंब करत बळकावू पहात आहेत. जिल्हाधिकारी यांनी तहसीदार यांना निर्देश देऊनही खेड तहसीलदार कारवाई करत नसल्याने पीडित शेतकऱ्यांनी खेडच्या प्रांत कार्यालयाच्या बाहेर हलगी नाद आंदोलन केले आहे.