राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी शिंदखेडा तालुक्यातील पपई पिकाच्या शेतीची पाहणी केली. यावेळी लाखो रुपये खर्च करूनही पपईच्या पिकाला अपेक्षित फळधारणा आणि उत्पादन न आल्याने संतप्त शेतकऱ्याने रोहित पवारांसमोरच उभ्या पपई पिकावर रोटावेटर फिरवला आहे.