पुणे आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने भीमा नदीपात्रातील पाणीपातळीत अचानक वाढ झाली आहे. या वाढत्या पाणीपातळीचा फटका करमाळा तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांना बसत असून,विद्युत मोटारी,पाईप, केबल काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे.