बदनापूर येथील पेट्रोल पंपावर ग्रामीण भागातील नागरिकांनी पेट्रोलसाठी गर्दी केल्याच पहायला मिळालं. रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि इतर पिकांच्या काढणीसाठी इंधनाची गरज आहे. मात्र इंधनाचा साठा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची पीक काढण्याची प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.