आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन व गॅस टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. या संभाव्य संकटाचा परिणाम आता ग्रामीण भागातही दिसू लागला असून वाशीम जिल्ह्यातील शेतकरी पर्यायी इंधनाच्या शोधात जुने पारंपरिक साधनांकडे वळताना दिसत आहेत.