खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी खते खरेदीसाठी बाजारात दाखल होत असतानाच रासायनिक खतांच्या किमतीत अचानक वाढ करण्यात आली आहे. गतवर्षीही खतांच्या दरात वाढ झाली होती. त्यामुळे यंदा तरी दर स्थिर राहतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र नव्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ होणार आहे. 20-20-0-13 या खताच्या गोणीचे दर 1500 रुपयांवरून 1800 रुपये करण्यात आले आहेत