मान्सून नंतरच्या अवकाळी पावसाने उघडीप दिल्यामुळे टोमॅटोच्या प्रतवारीमध्ये सुधारणा झाल्याने टोमॅटोच्या बाजारभावात वाढ झाल्याची बाब पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत समोर आली आहे. 99 हजार 575 टोमॅटो क्रेट्सची आवक झाली असून या टोमॅटोला जास्तीत जास्त 751 रुपये, कमीत कमी 50 रुपये तर सरासरी 551 रुपये प्रति एका 20 किलो टोमॅटोच्या क्रेट्सला बाजार भाव मिळाला चांगला बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.