आष्टी तालुक्यातील वेताळवाडी येथील अडीच वर्षे पूर्वी रेल्वेने दोन एकर जमिन संपादीत केली. अद्याप रेल्वे विभाने एकही रूपया दिला नाही. वारंवार रेल्वे विभागाकडे पाठपुरावा करुनसुद्धा शेतकऱ्यांची कसलीच दखल रेल्वे प्रशासन घेत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे वेताळवाडी येथील शेतकऱ्यांनी रेल्वे रूळावर आत्महदन करण्याचा प्रयत्न केला.यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी 'आमच्या जमिनीवर रेल्वे रूळ काढून घ्या,आमची जमीन मोकळी करुन दया अन्यथा आमचे व्याजासहित पैसे दयावेत,आमच्यावर आत्मदहन करण्याची वेळ आली आहे.' असं म्हटलं. पोलिस व राज्याच्या पोलिसांनी तात्काळ घटना स्थळी पोहोच झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.