सरकारने कांद्याला १२ रुपये ३५ पैसे बाजारभाव जाहीर केल्याने नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “१२ रुपयांत वडापाव तरी मिळतो का?” असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी हा दर मान्य नसल्याचे स्पष्ट केले.