भंडारा जिल्ह्यातील गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पावसाअभावी शेतातील ओलावा संपला असून जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. त्यामुळे धान्याची उगवलेली रोपे सुकू लागली आहेत.