धुळे जिल्ह्यात गेल्या पंचवीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. पावसाअभावी कपाशीच्या पिकाची पाने कोमेजू लागली असून, पिकावर मावा आणि तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढत आहे.