जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून केळीला उत्पादन खर्चाच्या मानाने अपेक्षित बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले होते. मात्र, लगतच्या मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुर बाजार समितीत आवक घटताच केळीचे भाव आता १००० रूपयांपर्यंत गेले आहेत.