मालेगाव तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. महिनाभरापूर्वी पेरणीसाठी तयार करून ठेवलेल्या जमिनी पावसाअभावी पुन्हा कडक झाल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पूर्वमशागती करण्याची वेळ आली आहे. जून महिना संपत आला तरी पावसाने दडी मारल्याने पेरणीचे नियोजन विस्कळीत झाले आहे.