नांदेड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये हळदीची लागवड झालेली आहे. उष्ण व दवट हवामान हळदीसाठी योग्य असते त्यामुळे हळदीची लागवड 15 मे ते जून महिनाभर चालत असते. हळदीची उगवण साधारण 15 ते 30 दिवसात होत असते. पण मृग नक्षत्रात पडणाऱ्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे आता हळद वाचविण्यासाठी शेतकरी चिंतेत सापडले आहेत.