नंदुरबार जिल्ह्यात पिकांना जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. वरुणराजा बरसत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर पिकांना हाताने पाणी देण्याची वेळ आली आहे. स्वतःच्या मुलाबाळांप्रमाणे पिकांना जगवण्यासाठी शेतकरी राजा पिकांना घोटभर पाणी देत आहे.