नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून केळी पपई लागवडीकडे कल वाढला आहे. जिल्ह्यात तिघी हंगामांमध्ये फळबागांची लागवड होत असते यात सर्वाधिक केळी आणि पपईची लागवड होत असल्याचं दिसून येत आहे एकीकडे तापमानाची तीव्रता आहे तर पिकांना संरक्षण मिळावं यासाठी क्रॉप कव्हर लावून लागवड केली जात आहे. आता शेतकऱ्यांचा कल पारंपरिक पिकांऐवजी फळबाग शेतीकडे वाढताना दिसत आहे.