शक्तिपीठ महामार्गाला राजू शेट्टी यांनी विरोध दर्शवल्यानंतर शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ सांगोला येथील शेतकऱ्यांनी अनोखा मार्ग अवलंबला आहे. महामार्गामुळे शेती, व्यापार व वाहतुकीला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करत शेतकऱ्यांनी प्रतिकात्मक श्री विठ्ठल मूर्तीला दुग्धाभिषेक केला. मूळ अरेखनाप्रमाणेच शक्तिपीठ महामार्ग व्हावा, सरकारला व विरोधकांना सुबुद्धी मिळावी, तसेच कामाला लवकर गती मिळावी, अशी प्रार्थना शेतकऱ्यांनी केली. विकासासाठी महत्त्वाच्या या प्रकल्पाला राजकीय विरोध नको, अशी भूमिका यावेळी शेतकऱ्यांनी मांडली.