गेल्या चार दिवसांपासून येवला व निफाड तालुक्यात हवामानात लक्षणीय बदल जाणवत आहे. आकाशात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, बदललेल्या वातावरणामुळे सकाळच्या सुमारास थंडीचा कडाका वाढत असल्याने, येवला परिसरात मोठ्या प्रमाणावर दाट धुक्याची चादर पसरली आहे, धुक्यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.