वाशिमच्या कारंजा तालुक्यात मागील एक महिन्यापासून पावसाचा खंड पडल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पिकं पूर्णतः सुकून गेली असून,शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत जाहीर करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामूअण्णा इंगोले आणि हर्षद पारे यांनी येवता परिसरात स्वतःला जमिनीत गाडून घेत आंदोलन सुरू केलं आहे.