अकोला जिल्हातील अकोट तालुक्यातील चौहाट्टा बाजार येथे खतासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात खतटंचाईचे चित्र कायम असून सकाळपासून खत खरेदीसाठी रांगा लावल्याचे दिसून आले आहे. तर यापूर्वीही गेल्या दोन दिवसांपासून खतासाठी अशाच प्रकारे शेतकरी रांगेत उभे असल्याचे चित्र चौहाट्टा बाजार येथे होते. तर आजही पहाटेपासून विविध कृषी केंद्रांबाहेर शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे.