माळशिरस तालुक्यातील निमगावात वावडी महोत्सव भरवण्यात आला आहे. वावडी म्हणजे एक प्रकारचा मोठा पतंग असतो. सुमारे दोनशे वर्षे जुना इतिहास असणारा कष्टकरी आणि शेतकऱ्यांचा मर्दानी खेळ म्हणून वावडीकडे पाहिले जाते. हल्ली वावडी हा खेळ मोबाईलच्या जमान्यात लोप पावत चालला आहे. मात्र माळशिरस मध्ये महोत्सव घेऊन वावडी खेळ खेळला जातो. हा खेळ पाहण्यासाठी सांगली, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील तरुणांनी गर्दी केली होती विशेष म्हणजे माळशिरस विधानसभेचे माजी आमदार राम सातपुते यांनी देखील वावडी उडवण्याचा आनंद घेतला...