देशांतर्गत द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकर्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्य द्राक्ष बागायतदार संघातर्फे आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. सांगलीच्या विश्रामबाग चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.