बीडमध्ये आज कापूस, सोयाबीन आणि तुरीला भाववाढ देण्याच्या मागणीसाठी शेतकरी हक्क मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सोयाबीनला 7 हजार रुपये प्रति क्विंटल तर कापूस आणि तुरीला 12 हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्याची मागणी करण्यात आली.