जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यात यावर्षी चार हजार हेक्टर वर गव्हाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. यावर्षी वाढत्या थंडीचा परिणाम गव्हाच्या पिकावर पडल्याने विक्रमी उत्पन्न गव्हाचे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा दिलासा मानला जात आहे. तर काही प्रमाणात चांगदेव परिसरात गारपिटचा तडाखा देखील पाहायला मिळाला. त्याचा देखील फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.