माजलगाव तालुक्यातील पवारवाडी परिसरात असलेल्या जय महेश साखर कारखान्यामुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. कारखान्यातून निर्माण होणारे विषारी केमिकलयुक्त सांडपाणी नियमबाह्य पद्धतीने जवळच्या एका खदानीत सोडण्यात आले. मात्र या सांडपाण्याचा निचरा होऊन ते आजूबाजूच्या शेतजमिनीत आणि विहिरींमध्ये शिरल्याने परिसरातील शेकडो एकर शेती बाधित झाली आहे.