शक्तिपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी उरण ईश्वरपूर या ठिकाणी शेतकऱ्यांकडून मोर्चा काढण्यात आला. ईश्वरपूर एसटी स्टँड ते तहसीलदार कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.