शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे.आज अर्धनग्न आंदोलनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यशवंत सेनेचे गजानन बोरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलेय. आंदोलनकर्त्यांनी डफडे वाजवत कृषी विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला.