गोंदियाच्या देवरी तालुक्यातील शिरपूर बांध परिसरात येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील धान पिकाच्या शेतीसाठी पाणी सोडण्यात यावे, या प्रमुख मागणीला घेऊन शेकडो शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालय देवरी येथे धडक दिली. रब्बी हंगामासाठी लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली.