राज्यभरात दुष्काळाच्या झळा पोहचण्यास सुरूवात झाली असून चारा पाण्याच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना आपल्याकडील पशुधन विकण्याची वेळ आली आहे.. अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथील जनावरांच्या बाजारात आज मोठ्या प्रमाणात जनावरांची विक्री होत असल्याचं बघायला मिळत आहे.