शेतकरी पुत्राने नायब तहसीलदारांच्या टेबलवर नोटा उधळल्या असून त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जालन्यातील बदनापूर तहसील कार्यालयातील ही घटना आहे. शेतजमिनीच्या रस्त्याच्या वादातून नायब तहसीलदारांच्या टेबलवर त्याने पैसे उधळले. रस्ता देण्यासाठी नायब तहसीलदारांनी पैशाची मागणी केल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.