गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसापासून शेतकरी ठिय्या आंदोलन करीत आहेत. शेतकरी आपल्या बैलगाड्यांसोबत अख्खे कुटुंब घेऊन या आंदोलनात सहभागी झाले आहेत. 14 गावातील शेतकरी कालपासून आंदोलन करीत आहेत. एमआयडीसी आणि विमानतळाच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे. विमानतळ आणि एमआयडीसी आम्हाला नको आम्हाला आमची जमीन हवी आहे अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.