अमरावती जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाचे आगमन होताच शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीला सुरवात केली आहे.मृग नक्षत्र लागून तब्बल २२ दिवस उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत होते.पावसाअभावी पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या.मात्र गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात अनेक भागांत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.