जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील बहाळ परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नारळी नदीला आलेल्या पुराने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. या पुरात चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील एका शेतकऱ्याने गुरांसाठी साठवून ठेवलेली मक्याच्या चाऱ्याची कुट्टी आणि त्यावरील शेड पुराच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेली.