बुलढाणा जिल्यातील सारशिव ते कासारखेड रस्त्याचे काम वर्षांपूर्वी मंजूर झाले असूनही अद्याप सुरू झाले नाही.. तर रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे .. परिणामी फळभाजी उत्पादक शेतकऱ्यांना याचा प्रचंड त्रास होत आहे.. येथे कांदा, कोबी, वांगी सह इतर भाजीपाला मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेतला जातो.. हंगामात दररोज ८-१० गाड्या अकोट, अकोला, अमरावती, नागपूरला शहरात पाठवल्या जातात.. मात्र खराब रस्त्यामुळे माल उशिरा पोहोचतो, वाहने खराब होतात, परिणामी शेतकऱ्यांचे मोठ आर्थिक नुकसान होते.. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या भागातील लोकप्रतिनिधी , सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली.. मात्र याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही .. तात्काळ या रस्त्याचे काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील या परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे..