धुळे जिल्ह्यातील साक्री आणि धुळे तालुक्यामध्ये सोमवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा नुकसान झालेला आहे. कांदा बाजरी गहू मका या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून तात्काळ पंचनामे करून मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.