परभणी जिल्ह्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली होती. मात्र झेंडूच्या फुलांना बाजारात दसऱ्याच्या मुहूर्तावर भाव न मिळाल्याने,शेतकऱ्यांचा तोडणी आणि माल वाहतुकीचा खर्चही निघाला नाही त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी अक्षरशः झेंडूची फुले रस्त्यावर फेकली आहेत.