भंडारा जिल्ह्यातील शेतकरी आता उन्हाळी धान पिकाला पर्याय म्हणून मका पिकाकडे वळलेले आहेत. उन्हाळी हंगामात अपूर्ण सिंचन सुविधा यामुळे कमी पाण्यात येणारे मका पिक जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या पसंतीचे ठरत आहे. या वर्षी रब्बी हंगामात ५० टक्के उन्हाळी धान पीक लावणाऱ्या शेतकऱ्यांनी मका लागवड केली असून पुढील काळात या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे शासनाने ही बाब लक्षात घेत ठीक ठिकाणी मका खरेदी केंद्र सुरू करण्याचे नियोजन करावे अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.