अकोला जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तर अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून सध्या हरभरा, गहू आणि कांदा ही पिके वाढीच्या तसेच काढणीच्या टप्प्यात आहेत. तर अशा वेळी अवकाळी पाऊस किंवा ढगाळ वातावरण कायम राहिल्यास या पिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.