जालना जिल्ह्यात यंदा जवळपास 6 लाख 47 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड आणि पेरण्या होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पेरणीपूर्व मशागती करून लागवड करण्यासाठी आपल्या शेतजमीन सज्ज करून ठेवल्या. मात्र जूनचा पहिला आठवडा पूर्ण उलटून गेला तरी देखील जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाचं आगमन न झाल्याने शेतकरी बांधवांच्या पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत.