जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात थंडीचा जोर वाढत असल्याने भाजीपाला पिकांना पोषक वातावरण मिळत आहे. थंड हवामानामुळे भाजीपाल्याची वाढ चांगली होत असून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम बाजारात दिसून येत असून, भाजीपाल्याची आवक वाढली आहे.