नंदुरबारच्या नवापूर शहरातील गुजराथी हायस्कूल आणि सार्वजनिक मराठी हायस्कूलच्या परिसरात माकडांचा उच्छाद वाढला आहे, त्यामुळे विद्यार्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. माकडांकडून विद्यार्थी आणि शिक्षकांवर होणारे हल्ले वाढले आहे. विद्यार्थी, शिक्षकांना चावा घेणे, विद्यार्थ्यांना नखाने ओरबडणे, दप्तरे, जेवणाचे डब्बे , शालेय साहित्य पळवणे असे प्रकार सुरू आहेत.