भंडारा जिल्ह्यात यंदा उन्हाळी आणि रब्बी हंगामात मका पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती. सध्या मका पीक परिपक्व झाल्याने शेतकरी मळणीच्या कामाला वेग देताना दिसत आहेत. दरम्यान, हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.