शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे सुमारे दीड ते दोन वर्षे वयाच्या बिबट्याच्या मादीचा वारंवार वावर आढळून येत होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाने परिसरात पिंजरा लावून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते.