अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील श्री ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने युवान मोहिमेंतर्गत रक्षाबंधनानिमित्त एसटी बस चालक आणि वाहकांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. या उपक्रमात संगमनेर एसटी आगारातील सुमारे 100 चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांना महाविद्यालयातील 20 विद्यार्थिनींनीराखी बांधून त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रवाशांच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी अहोरात्र झटणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांप्रती आदर आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला होता.