श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला भक्तिभावाने अर्पण करण्यात आलेली महावस्त्रे आता भाविकांसाठी अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पंढरपुरात सुरू असलेल्या या महावस्त्र महोत्सवाला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, धार्मिक श्रद्धेसोबतच भक्तांना प्रसादरूपात महावस्त्र घरी नेण्याची संधी मिळत आहे.