छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात आज एक धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या तपासणीदरम्यान नर्स आणि वैद्यकीय अधिकाऱ्यामध्ये शाब्दिक वाद झाला आणि पाहता पाहता या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाल्याची माहिती समोर आली आहे.