घराचं गेट बसवण्याच्या कारणावरून भावकीत वाद झाला. या वादाचे रूपांतर तुफान हाणामारी झाले. नांदेडच्या कंधार तालुक्यातील बाचोटी गावातील ही घटना आहे. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.