नागपूर जिल्ह्यातील कामठी परिसरात पोलिसांसमोरच दोन दुकानदारांमध्ये तुफान हाणामारी झाली. कामठी इथल्या शुक्रवारी बाजार परिसरातील ही घटना आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान ही हाणामारी झाली. दोन्ही दुकानदारांनी अतिक्रमण केलं होतं आणि त्यांचं अतिक्रमण हटवल्याची माहिती समोर येत आहे. एकमेकांच्या तक्रारीवरुन दुकानाचं अतिक्रमण हटवल्यामुळे वाद झाल्याचं कळतंय.