कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून आज कल्याण मध्ये इच्छुकांच्या मुलाखती सुरू होत्या. याच मुलाखती दरम्यान ठाकरे गटाचे पदाधिकारी निशिकांत ढोणे आणि भागवत बैसाणे यांच्यात बाचाबाची झाली. काही क्षणातच या दोघां मधील वादाचे रूपांतर हाणामारीत झाले या तुफान हाणमारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोघांनी देखील महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी धाव घेतली होती. मात्र पक्षातील वरिष्ठांनी आणि मनसे नेत्यांनी त्यांची समजूत काढत हा वाद मिटवला.