नालासोपारा पूर्वेतील आचोळे रोड, चंदन नाका परिसरात काल मध्यरात्री दीड ते दोन च्या सुमारास भर रस्त्यावर तुफान हाणमारी झाली. काही तरुणांनी दारूच्या नशेत रस्त्यावर उच्छाद माजवत खुलेआम धिंगाणा घालत एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. गस्तीवरील पोलीस सोडवायला गेले तर त्यांची गाडी रस्त्यावर पाडून धक्काबुक्की केल्याचा प्रकार व्हिडीओ मध्ये दिसत आहे.